Suman Farms
“Live long life happily with Nature”
विविध क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणार्या सुमन ग्रुप तर्फे पानशेतजवळ “पोळे” या गावी सुरू असलेल्या सुमन फार्मस् वर विविध शिबीरांचे आयोजन करत आहे व त्याबरोबर कृषी पर्यटनास चालनाही देत आहोत, त्यासंदर्भात नाव नोंदणी सुरु झाली आहे ज्यांना कृषी पर्यटन व शिबीरात आवड असेल त्यांनी सुमन फार्मशी संपर्क करा.
Suman Farm’s (सुमन फार्मस्) पोळे या गावी असुन “पोळे” या गावाविषयी सांगायचे झाल्यास पुण्यापासुन साधारण ६० ते ६५ किमी वर डोंगराच्या कुशीत पानशेत धरनाच्या मागील पानसाठ्यालगत वसलेले हे छोटस गाव म्हणजे निसर्ग सौंदर्याची उधळन असलेला पृथ्वीवरचा स्वर्गच. या भागाचा सहवास लाभने म्हनजे त्याची अनुभुतीच. निसर्ग वेलींनी व्यापलेले उंच डोंगर, भर उन्हात मंद गार वारा, पाण्याची नागमोडी वळणं आणि त्यात दिसनारे सुर्य चंद्रासह संपूर्ण परिसाराचे प्रतिबिंब, हिवाळ्यात सकाळच्या प्रहरी दिसनारे दाट धुके, पावसाळ्यात तर सरीवर सरी व मधेच ऊन आणि नभात इंद्रधनुषाची खैरात, चोहीकडे धबधब्यांचा मन सुखावनारा खळखळाट, पहाटे मोरांचा नाच तर कुठे पक्षांचा जाग आननारा किलबिलाट, डोळ्यांनी, कानांनी, मनाने निसर्ग सुखाचा खरा आनंद येणार्या पर्यटकांना उपभोगता यावा व त्यांचे आयुष्यमान वाढावे याचकरीता शुद्ध वातावरण व विलोभनिय निसर्गसौंदर्य लाभलेल्या “पोळे” गावची निवड आंम्ही सुमन फार्मस् साठी केली आहे.
इतर सुख सोई –
फार्मवर सेंद्रीय शेती करुन ताजा भाजीपाला पिकवुन सर्वांसाठी सात्विक आहार देनार असुन राहनीमान साधे असेल, प्रात:काळी योग प्राणायाम करत शुद्ध आहार विहार सोबत मन प्रफुल्लित रहान्यासाठी व काँस्मिक ऊर्जा ग्रहन करण्यासाठी इथे दत्तमंदिर व ध्यानमंदीर उभारण्यात आले असुन त्यात सर्वांना मनशांती साठी व एकाग्रतेसाठी ध्यान साधना करता येईल,सोबत चुलीवरची गावरान पिठले भाकरीचा स्वाद घेत मित्र व परिवाराचे मन सुखावुन जाईल.
Other Attractions :
- ठाणगाव गुहा
- देवराई मंदिर
- जंगल सफारी
- ट्रँकींग
- स्पोर्ट्स गेम
- म्युजिक मस्ती
- इन डोअर गेम
- सुर्य दर्शन
- व्हिलेज टुर
- फार्मिंग
- वर्षा नृत्य
- रानमेवा
- चुलीवरची भाजी भाकरी
- ट्री प्लांटेशन व इतर
डॉ. ज्ञानेश्वर मुंडलिक
संचालक
LIVE LONG LIFE HAPPILY with NATURE
info@sumanfarms.in
www.sumanfarms.in
+91 8888431157
